Sunday, 26 March 2017

वेडा राघू


दररोज खिडकीतून दिसणारा हा वेडा राघू आणि background च ते जांभळाच झाड..त्या छोट्या जीवांच तिथलं वावरणं अलबतच चैतन्य भरणार आणि माणसांच्या गर्दीतलं निसर्गाच्या जवळ नेणार..आज खिडकी तीच होती पण खिडकीतून दिसणार जांभळाच झाड तिथं नव्हतं कदाचित पानांचा कचरा होतोय दारात म्हणून तोडलेलं होत..वेड्या राघूच घरटं कुठल्याश्या पाचोळ्यात पडलेलं दिसलं...आणि तो वेडा राघूही वेड्यासारखा घिरट्या घालत असलेला दिसला आज...वाटलं काय वेडा आहे हा पक्षी..तुझ्या घरट्यासाठी आम्ही माणसांनी रोज रोज होणारा पाचोळा का सहन करायचा....