Sunday, 11 December 2016

जन्मतारीख सांगेल तुमचे लव्ह मॅरेज होणार की अरेंज मॅरेज

जन्मतारीख सांगेल तुमचे लव्ह मॅरेज होणार की अरेंज मॅरेज
1)    मूलांक 1. - 1, 10, 19, 28 ही जन्मतारीख असलेल्या व्यक्तींचा मूलांक 1 असते. ज्यांचा मूलांक 1 असतो त्यांचा स्वामी सूर्य असतो. 1 मूलांक असलेल्या व्यक्ती लाजाळू असतात. त्यामुळे अशा व्यक्ती प्रेम जाहीर करु शकत नाहीत. यामुळेच अशा व्यक्ती लव्ह मॅरेज करु शकत नाहीत. 
2)    मूलांक 2 - ज्यांची जन्मतारीख 2, 11, 20, 29 असते त्यांचा मूलांक 2 असतो. यांचा स्वामी चंद्र असतो. यांनी जर लव्ह मॅरेज करण्याचा निश्चय केला तर तो निश्चय त्या पूर्णत्वास नेतात. 
3)    मूलांक 3 - 3, 12, 21, 30 ही जन्मतारीख ज्यांची असते त्यांचा मूलांक 3 असतो. यांचा स्वामी गुरु असतो. लव्ह मॅरेज करण्यात या व्यक्ती यशस्वी होतात. तसेच यांचे वैवाहिक जीवनही सफल होते.
4)    मूलांक 4 - ज्यांची जन्मतारीख 4,13, 22, 31 असते त्यांचा मूलांक 4 असतो. यांचा स्वामी राहू असतो. अशा व्यक्तींचे एकापेक्षा अधिक लोकांशी प्रेमसंबंध असू शकतात. जरी अशा व्यक्तींनी लव्हमॅरेज केले तरी त्याबाबत ते गंभीर नसतात.
5)    मूलांक 5 - 5,14,23 ही ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचा मूलांक  5 आहे. यांचा स्वामी बुध आहे. या व्यक्तींची पारंपारिक विवाहरिती तसेच घरच्यांच्या संमतीनेच विवाह करण्यास पसंती देतात. अशा व्यक्तींचे विवाह सफल होतात. 
6)    मूलांक 6 - ज्यांची जन्मतारीख 6,15,24 आहे त्यांचा मूलांक 6 असतो. यांचा स्वामी शुक्र असतो. अशा व्यक्तींचे एकापेक्षा अधिक लोकांशी प्रेमसंबंध असू शकतात. त्यामुळे चांगल्या व्यक्तीला गमावतात. 
7)    मूलांक 7 - 7,16,25 ही जन्मतारीख असणाऱ्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो. यांचा स्वामी केतु मानला जातो. यांना लव्ह मॅरेज करायचे असते मात्र ते त्यांच्या स्टेटसनुसार
8)    मूलांक 8 - ज्यांची जन्मतारीख 8,17, 26 असते त्यांचा मूलांक 8 असतो. यांचा राशी शनी असतो. अशा फार कमी व्यक्ती प्रेमसंबंध ठेवतात. मात्र एखाद्यावर प्रेम केले तर मरेपर्यंत कायम ठेवतात. 

9)    मूलांक 9 - ज्यांची जन्मतारीख 9,18, 27 आहे त्यांचा मूलांक 9 आहे. यांचा स्वामी मंगळ असतो. अशा व्यक्ती खूप घाबरणाऱ्या असतात. वादापासून दूर राहणे पसंत करतात. त्यामुळे अनेकदा इच्छा असूनही त्या लव्हमॅरेज करु शकत नाहीत. 

Saturday, 3 December 2016

खरंच मुलगी पाहिजेच !!!!!!

माझी मुलगी मोठी झाली.
एके दिवशी सहज म्हणाली,
*'पप्पा मी तुम्हाला कधी रडवलंय का?'*
मी म्हटलं,
'का रे पिल्लू असं का विचारतेस?'
ती : 'काही नाही असंच.'
मी : 'नीट आठवत नाही. पण एकदा '
ती : 'कधी?'
तिनं अधिरतेनं विचारलं.
मी म्हणालो, 'तू एक वर्षाची असताना मी
तुझ्यासमोर पैसे, पेन आणि खेळणं ठेवलं.
कारण मला बघायचं होतं की,
तू काय उचलतेस?
तुझी निवड ठरविणार होती की,
मोठेपणी तू कशाला जास्त महत्व देतेस.
जसे
*पैसे* म्हणजे संपत्ती,
*पेन* म्हणजे बुद्धी
आणि
*खेळणं* म्हणजे आनंद.
मी हे सर्व सहजच पण उत्सुकतेने करत होतो.
मला बघायची होती तुझी निवड.
तू एकाच ठिकाणी बसून आळीपाळीने सर्व
गोष्टींकडे बघत होतीस
आणि
मी तुझ्या पुढ्यातच बसून शांततेने तुझ्याकडे
पहात होतो.
तू रांगत-रांगत पुढे आलीस.
मी श्वास रोखून पहात होतो
आणि
क्षणार्धात तू त्या सगळ्या वस्तू बाजूला सारून
माझ्या मिठीत शिरलीस.
माझ्या लक्षातच नाही आलं की,
'या सगळ्यांबरोबर मीसुद्धा एक *निवड* असू
शकतो.'
ती पहिली वेळ होती जेव्हा तू मला रडवलंस.
खास मुलींच्या पप्पांसाठी.
खरंच मुलगी पाहिजेच.